उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सन २०२१ मध्ये आंबेशिवणी परिसर नजिक एका गावातील नागरिक विहाराची समस्या घेवून जवळपास ३० नागरिक शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विनय बांबोळे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांचेकडे येऊन आपबिती सांगीतली.ॲड.विनय बांबोळे,प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी त्यांची समस्या तहसिलदार व ठाणेदार गडचिरोली यांना सांगुन सदर गावातील वाद मिटवून विहाराचा हक्क गावकर्यांना मिळवून दिला.नुकतेच त्या विहाराचे उदघाटन झाले. परंतु ज्या नेत्यांनी विहाराचा हक्क मिळवून दिला. त्यांना साधे उदघाटन कार्यक्रमात विचारले सुध्दा नाही.याला काय म्हणावे ? प्राप्त माहीतीनुसार,ज्या व्यक्तीकडे उदघाटन करण्याकरीता बोलविले त्यांना वाटते की,मीच खरा जिल्ह्यातील नेता आहे.मी,माझा भाऊ व माझी पत्नी हेच खरे समाज सेवक आहोत. इतरांना बोलावू नका?असे गावकऱ्यांना मुर्ख बनविले जात आहे.नाते संबधातुन पक्ष चालविणारे,पैशाच्या वादातून वंचितने हाकलेल्या अश्या स्वयंघोषित नेत्या पासुन फुकुनच पाणी प्यावे लागेल.अश्या प्रकारचे मत ॲड.विनय बाबोळे व प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी व्यक्त केले आहे.