उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- साकोली पोलिस स्टेशनअंतर्गत चिंगी वांगी या गावातील विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.साकोली पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.स्वप्नील डोंगरे वय ३२ वर्षे असे सदर युवकाचे नाव असून,अलीकडेच डिसेंबर महिन्यात त्याचा विवाह झाला होता.दरम्यान,पत्नी माहेरी गेली असता त्याने काल,शनिवारी सकाळी १० वाजेदरम्यान घरीच आत्महत्या केली.पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवले.या प्रकरणाचा तपास साकोली पोलिस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

