- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कोर्टाची पायरी चढावी लागलेल्या अनेकांना वकील नेमण्याचा खर्चही परवडत नाही.अशा गरजू आणि गरीब नागरिकांना विधि सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील सेवा पुरविण्यात येते. मात्र,याबाबत अनेकांना माहितीच नसल्याने या सेवांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत असल्याचे दिसून येतात.
कोर्टातील केसेसमध्ये अनेकदा पक्षकारांना वकील नेमावा लागतो.मात्र,गरजू आणि गरीब लोकांना वकील नेमण्याचीही ऐपत नसते.त्यामुळे अनेकजण कारागृहात लटकून असतात.परंतु,गरजूंना न्यायासाठी विधि सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील सेवा देण्यात येते.त्यांत अनेकांना फायदा होतो.गरजूंना मोफत वकील मिळत असतो,याबाबतची माहिती नाही.त्यामुळे या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.मोफत कायदेशीर मदतीसाठी अनुसूचित जातीचा किंवा अनुसूचित जमातीचा सदस्य घटनेच्या अनुच्छेद २३ मध्ये उल्लेखित मानवी तस्करी किंवा सक्तीच्या मजुरीचे बळी,कोणतीही स्त्री किवा मूल,शोषण व वेठबिगारीचे बळी ठरलेले व्यक्ती,मनोरुग्ण किंवा दिव्यांग व्यक्ती,जातीय हिंसा पीडित व्यक्त्ती आदींना विनामूल्य न्याय मिळवू शकतो.
- Advertisement -