Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीविद्यमान सरपंचाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा..

विद्यमान सरपंचाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मुधोली रिठ येथील ४० वर्षीय विद्यमान सरपंचाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल,सोमवार ५ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. मंगलदास आत्राम रा.मुधोली रिठ,ता.चामोर्शी, जि.गडचिरोली असे मृत सरपंचाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,घटनेच्या दिवशी मंगलदास आत्राम हे घरीच होते.अशातच सकाळच्या सुमारास ते घराबाहेर पडले.बराच कालावधी होऊनही घरी परतलेच नाही.त्यातच दुपारच्या सुमारास ३ वाजेच्या दरम्यान मुधोली चक.नं.२ गावातील काही शेतकरी शेत बांधावर गेले असता,त्यांना शेतशिवारातील एका वृक्षाला मंगलदास आत्राम हे लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच नागरिकांनी एकच गर्दी केली.विद्यमान सरपंचाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? अश्या चर्चांना उधाण आले.काही नागरिकांनी घटनेची माहिती आष्टी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह खाली उतरवित पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला.घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!