Wednesday, August 5, 2026
Homeनागपूरवाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट नदीपात्रात पलटी; सात गंभीर जखमींना नागपूरला हलविले.....

वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट नदीपात्रात पलटी; सात गंभीर जखमींना नागपूरला हलविले.. – पहा व्हिडिओ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गडचिरोली जिल्ह्याच्या आल्लापल्ली येथे एका मराठी चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.शूटिंग संपल्याने शूटिंगचे साहित्य घेऊन नागपूरला परत जात असतांना उमरेड-भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील मरूनदीच्या वळणावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आयशर ट्रक साहित्यासह थेट नदीपात्रात शिरून पलटी झाला. यात चालकासह सातजण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी वळणमार्गावर बॅरिकेडस्च्या स्वरूपात लोखंडी ड्रम लावून ठेवले होते.त्यामुळे थोडक्यात बचावले अन्यथा वाहन थेट नदीपात्रातील पाण्यात पडले असते.
काल शुक्रवारी एमएच ४० बीजी २६१९ क्रमांकाचा आयशर ट्रक शूटिंग आटोपून नागपूरला परत जात होता. परत जात असतांनाच दुपारच्या सुमारास भिवापूर मरूनदी पुलावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटताच ट्रकने मार्गावर असलेल्या लोखंडी ड्रमला धडक देत नदीपात्रात शिरून पलटी झाला.यात चालकासह सातजण गंभीर जखमी झाले.माहिती मिळताच भिवापूरचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनात दबलेल्या आठही जणांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले.
गोविंद रामजी रघुते वय ३५ वर्षे,रा.नागपूर,आकाश मनोज यादव वय २७ वर्षे,जावेद शेख रमजान मन्सुरी वय २९ वर्षे,दोघेही रा.चवरेलॉन ग्राम, जि.छिंदवाडा,हरीश कुवरमन महेर वय ३४ वर्षे,रा.छिंदवाडा,वसंत रामसिंग डेहरिया वय ४७ वर्षे,रा.मटकाहांडी,जि.छिंदवाडा, अभिषेक शिवप्रसाद यादव वय २२ वर्षे,रा.चक्की खमरिया,जि.शिवणी, मध्यप्रदेश,अनुपकुमार राजेंद्रप्रसाद महंतो वय ३८ वर्षे,रा.कुसैगाबाद,जि.सैकपुरा,बिहार, आनंद देवचंद रॉय वय ३५ वर्षे,रा.विरार,मुंबई अशी जखमींची नावे असून आठपैकी गंभीर सात जणांना नागपूरला हलविण्यात आले.महिनाभरात मरूनदीवर झालेल्या दोन अपघातांत एकाचा मृत्यू,तर पाचजण जलसमाधी मिळण्यापासून थोडक्यात बचावले. दोन्ही अपघातांत बॅरिकेडस्च्या रूपात पोलिसांनी वळणमार्गावर लावलेले लोखंडी ड्रम सुरक्षेची ढाल ठरले.काल शुक्रवारीही हेच ड्रम आठजणांसाठी संजीवनी ठरले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!