- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात दुःखद घटना काल शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. एकाच कुटुंबातील चार जण रासायनिक खत खरेदी करण्यासाठी जात असतांनाच वाटेत अचानकपणे वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून चारचाकी वाहन सुरक्षा भिंतीला जाऊन धडकले.यात चालक तथा रोजगारसेवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील सालेकसा-दर्रेकसा मार्गावरील लालघाट परिसरात घडली.३२ वर्षीय सरोज सोहन कमरे रा.टेकाटोला दंडारी,ता.सालेकसा,जि.गोंदिया असे मृत रोजगारसेवकाचे नाव आहे,तर २५ वर्षीय
मनोज मदन कमरे,१८ वर्षीय रोहित श्यामलाल कमरे आणि १५ वर्षीय आर्यन श्यामलाल कमरे तिघेही जखमी झाले.सदरची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमींना दर्रेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.मात्र,चालक तथा रोजगार सेवक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील टेकाटोला दंडारी येथील कमरे परिवारातील चौघेही काल शनिवारी सकाळच्या सुमारास एम एच ३५ पी ३६९३ क्रमांकाच्या टाटा सुमो वाहनाने रासायनिक खत खरेदीसाठी दर्रेकसा येथे जात होते.दरम्यान लालघाटनजीक वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने वाहन मार्गावरील घाटावर असलेल्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकले.अपघात इतका भीषण होता की,वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

