Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवाहनधारकांसाठी मोठी घोषणा..! 'या' तारखेपासून सुरू होणार वार्षिक 'फास्टॅग' पास..

वाहनधारकांसाठी मोठी घोषणा..! ‘या’ तारखेपासून सुरू होणार वार्षिक ‘फास्टॅग’ पास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यासाठी वाहनधारकांना तीन हजार रुपयात वर्षभर (२०० ट्रीप) टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) येत्या,१५ ऑगस्टपासून फास्टॅग (FasTag) वार्षिक पास ही नवीन सुविधा सुरू करत आहे.या पासमुळे वारंवार टोल रिचार्ज करण्याचा त्रास आणि टोल प्लाझावर लांबलचक रांगेत थांबण्याचा त्रास कमी होईल.प्रवास केवळ सोपा नाही तर स्वस्तही होईल.सदरची योजना ही फक्त नॉन-कमर्शियल खासगी गाड्यांसाठी (कार,जीप,व्हॅन) लागू आहे.फक्त एकदाच ३ हजार रुपये भरून वाहनधारकांना २०० टोल क्रॉसिंग किंवा १ वर्ष (जे आधी संपेल ते) इतक्या कालावधीसाठी टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.
ऑनलाइन रिचार्जची गरज भासणार नाही.केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, ही योजना विशेषतः ६० किलोमिटर परिघातील टोल प्लाझांवरील अडचणी सोडवण्यासाठी आणि पेमेंट सिस्टीम सोपी करण्यासाठी आणली आहे.
ही सुविधा फक्त भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
(NHAI)आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या (MoRTH)अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर लागू असेल.उदाहरणार्थ-दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे,मुंबई-नाशिक,मुंबई-सूरत,मुंबई-रत्नागिरी. मात्र,राज्य सरकारांच्या अखत्यारीतील रस्त्यावर (मुंबई-पुणे एक्सप्रेसवे,मुंबई-नागपूर एक्सप्रेसवे,अटल सेतू,आग्रा-लखनौ एक्सप्रेसवे,बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवे,अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवे)फास्टॅग नेहमीचे शुल्क लागू होतील.राजमार्ग यात्रा (Rajmarg Yatra)ॲप किंवा NHAI/MoRTH च्या वेबसाइटवर जाऊन वाहन क्रमांक व फास्टॅग आयडी टाकून लॉगिन करा.फास्टॅग सक्रिय आणि वाहनशी नीट लिंक असावा.त्यानंतर ३ हजार रुपयांचे ऑनलाइन पेमेंट (UPI,कार्ड, नेटबँकिंग)करा.हा पास तुमच्या फास्टॅगशी लिंक होईल आणि १५ ऑगस्टला एसएमएसद्वारे ॲक्टिवट होईल.सदरची पास ही फक्त खासगी वाहनांसाठीच लागू असून पास ही हस्तांतरणीय नाही.रजिस्टर्ड वाहनापुरते मर्यादित आणि निवडक महामार्गावरच लागू होणार आहे.तसेच कालावधी संपल्यानंतर पुन्हा अर्ज करावा लागेल. सदरची पास ही दररोज प्रवास करणारे, ऑफिस कम्युटर्स,इंटर-सिटी ट्रॅव्हलर्स यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवेल.तसेच,टोल प्लाझांवरील ट्रॅफिक कमी होऊन प्रवास अधिक वेगवान होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!