- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-लोखंडी सळाख भरून जाणाऱ्या ट्रकचा वाटेतच अचानकपणे टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन पुराडा-रामगड टी पॉइंटवरील वनविभागाच्या नाक्याजवळ पलटी झाल्याने ट्रकच्या केबिनमध्ये चालक तब्बल एक तास अडकून राहिला.पलटी होण्यापूर्वी मार्गावर कुणीही नसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.मात्र,ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास वाचविण्यासाठी यंत्रणांना मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याची घटना काल,रविवारी दुपारच्या सुमारास घडली.राकेश लल्लन यादव वय ३५ वर्षे रा.बिजमोहनकटेरा जि.बलिया,उत्तर प्रदेश असे जखमी चालकाचे नाव असून तो एकटाच छत्तीसगड राज्याच्या रायपूरवरून तेलंगणाच्या हैदराबादकडे कोरची मार्गे सीजी ०४ पीवाय ०५४९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये लोखंडी सळाख घेऊन वाहतूक करीत होता.अश्यातच कुरखेडा तालुक्याच्या पुराडा गावानजीक येताच रामगड टी-पॉइंटजवळ ट्रकचा एक टायर फुटला.टायर फुटताच वाहनात अवजड साहित्य असल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला.ट्रक उलटल्याची घटना नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.त्यात ट्रकच्या केबिनमध्ये चालक अडकून पडल्याचे निदर्शनास येताच पुराडा पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस प्रशासन व नागरिकांनी बुलडोजरच्या साहाय्याने ट्रक उभा करून तब्बल एक तासांनी चालकाला सुखरूप बाहेर काढून त्याला रुग्णालयात हलविले.
- चालकास बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न👇
- Advertisement -

