उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- २०२४ च्या लोकसभा निवडणूकांपूर्वी मिहानमध्ये एक लाख तरूणांना रोजगार देणार;असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ‘फॉर्च्युन फाउंडेशन’च्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात ते आज १९फेब्रुवारी रोजी नागपूरात बोलत होते.
गडकरी म्हणाले,३१ मार्च रोजी इन्फोसिसच्या नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे.त्यात ५ हजार तरूणांना रोजगार मिळणार आहे. एचसीएल,टीसीएसने यापूर्वी ७ हजारांना रोजगार दिला.आता ते ३० हजार रोजगार देणार आहेत. भारतात एकूण मेट्रो १३ हजार २२३ आहेत. मिहानमध्ये आतापर्यत ८७ हजार ८९० जणांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे.खासदार म्हणून पुढील निवडणूकीला सामाेरे जाण्यापूर्वी मिहानमध्ये १ लाख तरूणांना रोजगार देणार आहोत.रोजगार निर्मिती झाली पाहिजे.त्यासाठी उद्योग आले पाहिजे. उद्योग व्यापार वाढला तर रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मितीच्या नवनवीन संधी शोधल्या पाहिजे. महालमध्ये जून्या बाजारात ६०० महिला जूने कपडे गोळा करून विकतात.त्यांना शिलाई मशिन,रफ्फु मशिन,वाॅशिंग मशिन मिळाले तर गरीबांना चांगले कपडे मिळतील.या महिलांना एकेक लाख रूपये कर्ज देणार आहे.त्यासाठी फार्च्युन फाऊंडेशनने पुढाकार घेत या महिलांकडून अर्ज भरून घ्यावे.
प्लॅस्टिकपासून पेट्राेल
प्लॅस्टिकपासून क्रुड पेट्राेल काढण्याचा नवीन प्रकल्प मी सुरू करीत आहे.तीन महिन्यात प्रकल्प सुरू होईल.हे पेट्रोल डिझेलध्ये वापरता येईल.त्यावर ट्रक व बस चालू शकेल.प्लास्टिक न जाळता विशिष्ट तापमानावर तापवायचे.मग ते वितळेल.ते ८० ते ८८ अंशावर हीट केले म्हणजे द्रव निघते.ते थंड केले की त्यातून पेट्रोल मिळते.अहमदाबाद ते डोलेरा या रस्त्यात तेथील महापालिकेचा २० लाख टन कचरा वापरणार आहे.८ लेनचा हा रस्ता आहे.फार्च्युन फाऊंडेशनने लोकांकडून रोजगार निर्मितीच्या कल्पना मागवाव्या.त्यातील चांगल्या कल्पनांवर काम करता येईल असे गडकरी म्हणाले.