उद्रेक न्युज वृत्त :- आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे.हे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेल्या अद्वितीय बारा अंकी क्रमांकासह मुद्रित केले जाते.हा क्रमांक भारतात कोठेही व्यक्तीच्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा आहे. यापुढे शासकीय योजनेतील लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड स्कॅन करून प्रमाणित करण्यात येणार आहे.
आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा आहे.सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्डची सर्वात आधी गरज भासते. बँक खाते उघडायचे असो किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो की एलपीजी सिलिंडरचे अनुदान असो,आधार क्रमांकाची जवळपास सगळीकडे मागणी केली जाते.पि एम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेत आधार कार्डचा वापर करण्यात येतो. काही शासकीय योजना आधार कार्ड वरील वय गृहीत धरून मान्य केल्या जातात.यात बरेच नागरिक मॅन्युअल पद्धतीने बोगस आधार कार्ड बनवून शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतात.यात शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे.त्यामुळे समाजातील गरीब, पात्र व वंचित घटकाला या योजनेपासून वंचित राहावे लागते.
यापुढे शासनाने शासकीय योजनात वापर करण्यात येत असलेल्या आधार कार्डचे क्यूआर कोड स्कॅन करून प्रमाणित केल्यानंतर शासकीय योजनांचा लाभ देण्याचे ठरविले आहे.यामुळे बोगस लाभार्थी आपोआप प्रशासनाला ठरविता येणार आहे.तसेच शासकीय योजनेत नागरिकांनी सादर केलेल्या आधार कार्ड बाबत खोटी माहिती आढळल्यास योग्य ती कारवाई करण्याचे शासनाने ठरविले आहे.
आधार कार्ड मध्ये वय,फोटो यात मॅन्युअल पद्धतीने खोडतोड केल्या जाते.हा आधार कार्ड शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी नागरिकांकडून सादर केल्या जातो.परंतु क्यू आर कोडला बदलविता येत नाही.आधार कार्ड सोबत पडताळणी फार्ममध्ये इतर पदाधिकारी यांची संमती असल्याने त्या लाभार्थ्याला काही विशिष्ट योजनेतून बाहेर काढता येत नाही. त्यामुळेच आधार कार्ड वरील क्यू आर कोड प्रमाणित करण्याचे शासनाकडून ठरविण्या आले आहे.