Monday, September 14, 2026
Homeगोंदियालाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत; मात्र शिक्षकांसाठी नाही- शिक्षक आमदार सुधाकर अडबाले

लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत; मात्र शिक्षकांसाठी नाही- शिक्षक आमदार सुधाकर अडबाले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शासनाने निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करून त्यांना लाभ दिला.पण,उद्याचे भविष्य घडविणारे आमचे राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी हे टप्पा वाढ अनुदान मंजूर करण्यासाठी फक्त ९२६ कोटींची तरतूद मागत आहे,जुनी पेन्शन योजना मागतात त्यांच्यासाठी सरकारकडे पैसे नाही, ही शोकांतिका आहे; अशी टीका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ गोंदिया जिल्हातर्फे शिवराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,मरामजोब ता.देवरी,जि.गोंदिया येथे काल,रविवारी जिल्हा अधिवेशन पार पडले.त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर अडबाले बोलत होते.
प्रसंगी ते म्हणाले की,शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जोपर्यंत शिक्षणाचा पाया मजबूत होणार नाही; तोपर्यंत उज्वल भवितव्याचा विचार कसा केला जाऊ शकतो? शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यास शासन नकारात्मक भूमिका बजावत आहे.कारण इतरांचा विचार केला जातो,मात्र शिक्षकांचा विचार केला जात नसल्याने शिक्षकांच्या मागण्या संदर्भात आमची लढाई सुरूच असणार असल्याचे आमदार अडबाले यांनी सांगितले.
 अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व्ही. यू.डायगव्हाणे तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य डी. एस.हुकरे होते.याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख,जगदीश जुनगरी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, विमाशि संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे,विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले,गोंदिया विज्युक्ताचे अध्यक्ष पवन कटरे,अरविंद शरणागत, प्रभाकर वहाटे,चंद्रपूर महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, गोंदिया जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, जिल्हा कार्यवाह संदीप मांढरे व मोठ्या संख्येने प्राचार्य,मुख्याध्यापक, प्राध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!