Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीलाखोंचे कर्ज रेवड्या-फुटाण्याप्रमाणे वाटल्याचा आरोप... - भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये सह इतरांवर...

लाखोंचे कर्ज रेवड्या-फुटाण्याप्रमाणे वाटल्याचा आरोप… – भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये सह इतरांवर फसवणुकीचा गुहा दाखल.. – कुरखेडा येथील संस्कार क्रेडिट को-ऑप.सोसायटी संस्थेतील प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-एरवी कुठलेही कर्ज घ्यायचे झाले तर सर्वप्रथम कर्ज कशासाठी हवे? काय काम करता? व नंतर किती रकमेचे कर्ज हवे,असे नाना तऱ्हेचे प्रश्न विचारून एखाद्याला कर्ज द्यायचे की नाही; हे ठरविले जाते व पुढील प्रक्रिया योग्यरीत्या पार पाडून कर्ज मंजूर केले जाते.मात्र,गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा शहरात वेगळाच प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.कुरखेडा येथील संस्कार क्रेडिट को-ऑप.सोसायटी मर्यादित गडचिरोली या संस्थेत कुठल्याही कर्जासाठी अर्ज केलेला नसतांना संस्थेने विशिष्ट लोकांना कुठलेही कारण नसतांना व काहीही तारण न ठेवता लाखोंचे कर्ज दिले व ते एकरकमी खात्यातून उचलले.संस्थेची आर्थिक क्षमता नसतांनाही बेकायदेशीरपणे लाखोंचे कर्ज रेवड्या-फुटाण्याप्रमाणे वाटले असल्याचा आरोप तक्रारदार वेदप्रकाश राठोड यांनी ठेवला आहे.

खातेधारकांच्या परस्पर ही सगळी अफरातफर सुरू असल्याने काल,गुरुवार १९ डिसेंबरला कुरखेडा पोलीस ठाण्यात संस्कार क्रेडिट को-ऑप.संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांसह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.आरोपींमध्ये भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फायेंचाही समावेश आहे.
एका मराठी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार,वेदप्रकाश विजयसिंग राठोड वय ३८ वर्षे,रा.गांधी वॉर्ड चौक, कुरखेडा असे तक्रारदाराचे नाव आहे.ते संस्कार क्रेडिट को ऑप.सोसायटीचे भागधारक व दैनंदिन बचत खातेधारक आहेत.कोरची शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक शुभम राजकुमार परिहार यांच्या खात्यातून परस्पर २१ लाख ५० हजार रुपये कर्ज उचलले,प्रभा रामकुमार परिहार यांच्या नावे २० लाख ९९ हजार ९०० रुपये कर्ज उचलले.मुनेश्वर पारधी, लोमेश पारधी या खातेदारांच्या नावेही परस्पर कर्ज उचलल्याचे तक्रारीत नमूद आहे.संस्थेचे लेखापरीक्षण केले नाही.दायित्व नियम ३५चे उल्लंघन केले,निधी निर्मिती व विनियोगाबाबत वार्षिक सभेत मंजुरी घेतली नाही,असा दावाही तक्रारीत केला आहे. त्यानुसार संस्कार क्रेडिट को-ऑप.सोसायटीचे अध्यक्ष मनीष फाये,मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज बांगरे, संस्था उपाध्यक्ष व भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, संचालक दीनदयाल भट्टड,नितीन कावळे,मंगेश मांडवे, हरिश टेलका,लक्ष्मण धुळसे,परसराम नाट,चेतना कुंभलवार, मंगला वडीकर,व्यवस्थापक दिवाकर देवांगण,कर्ज अधिकारी प्रल्हाद लांजे यांच्यावर कुरखेडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ४०६,४०७,४०८,४०९,४१८,४२०,५६४,५६५, ४६८,४७१,४७४,४७७ -अ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास कुरखेडा ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!