- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सुरुवातीला सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवर मैत्री,मैत्रीचे रुपांतर प्रेमात,प्रेमात आणाभाका,लग्नाचे आमिष,नंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध,नोकरी लागताच संपर्क तोडण्याचा प्रयत्न, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीची पोलिसांत धाव आणि चक्क उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यावर शोषण केल्या प्रकरणी नागपूरच्या इमामवाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.दर्शन दुगड वय ३० वर्षे,रा.यवतमाळ असे आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.पीडित युवती एका खासगी महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.तर आरोपी पोलीस अधिकारी सध्या नंदुरबार जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर कार्यरत आहे.
उच्चशिक्षित डॉक्टर युवतीचे बऱ्याच दिवसांपासून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासोबत प्रेमप्रकरण असल्याने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी लग्नाचे आमिष दाखविले व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.तत्पूर्वी आरोपी पोलीस उपविभागीय अधिकारी नव्हता म्हणजेच आयपीएस अधिकारी नव्हता.जशी नोकरी लागली व उपविभागीय अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर पिडीत युवतीशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न सुरू होता.त्यातच डॉक्टर युवतीने लग्नाची इच्छा व्यक्त करताच शिवीगाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टर युवतीने नागपूरच्या इमामवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार इमामवाडा पोलिसांनी उपविभागीय अधिकारी दर्शन दुगड विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने कोणी कितीही मोठा असो,कायदा हा सर्वांसाठी समान असल्याची प्रचिती सदर प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
- Advertisement -