उद्रेक न्युज वृत्त
पुणे: फिर्यादी महिला ही ३० वर्षांची आहे.सदर महिला ही बी.टेक.आणि एम.बी.ए.अशी उच्चशिक्षित आहे.ती एका कंपनीत नोकरीस आहे.जून २०२२ मध्ये तिचा विवाह पुण्यातील एका उच्चशिक्षिततरुणासोबत झाला.तिचा पती अभियंता असून,तोही एका बड्या कंपनीत नोकरीस आहे.लग्नानंतर ते मधुचंद्रासाठी मालदीव येथे गेले होते.पण त्यांच्यामध्ये पती-पत्नीप्रमाणे संबंध आले नाहीत.त्यानंतरही पतीकडून टाळाटाळ सुरू होती.
लग्न होऊन आठ महिने झाले तरी पती जवळ येत नाही.जवळ झोपण्याऐवजी लांब जाऊन झोपतो. याविषयी जाब विचारला तर मला शरीरसंबंध ठेण्याची इच्छा होत नाही असे उत्तर मिळते.हा प्रकार घडलाय पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चंदननगर परिसरात.याप्रकरणी पत्नीने पती विरोधात चंदननगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.लग्नाच्या आठ महिन्यानंतरसुद्धा पती आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवत नाही.म्हणून या महिलेने पतीकडे विचारणा केली.तिच्या लक्षात आले की आपला पती शाररिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे.सत्य समजताच तिच्या पायाखालची वाळूच सरकली.आपली फसवणूक झाली असल्याचे समजले.पण पुढे आणखी भयंकर तिच्या आयुष्यात घडणे बाकी होते.
याविषीयी कुठे वाच्यता करू नये म्हणून तिला मारहाण करण्यात येऊ लागली.शाररिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता.यासाठी पती आणि सासू-सासऱ्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली.याबाबत विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केलेली नाही.