Wednesday, August 5, 2026
Homeगोंदियालग्नसमारंभाच्या जेवणातून विषबाधा; दोन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक...

लग्नसमारंभाच्या जेवणातून विषबाधा; दोन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-लग्नाच्या जेवणातून ७० लोकांना विषबाधा होऊन दोन चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरू आहेत.सदरची धक्कादायक घटना तालुक्यातील ग्राम बबई येथे शनिवारी घडली.गोरेगाव तालुक्यातील ग्राम बबई येथील केशोवराव बिसेन यांच्याकडे गुरुवारी ३ एप्रिलला मुलाचा लग्नसमारंभ होता.शुक्रवारी  ४ एप्रिल रोजी परतीची वरात बबई येथे आल्यानंतर उपस्थित वऱ्हाडी आणि गावकऱ्यांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास जेवण देण्यात आले.मात्र,या जेवणातून जवळपास ७० लोकांना विषबाधा झाली असून,यात आठ बालकांचा समावेश असतांनाच दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.यामुळे त्यांना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.२९ रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात, एका खासगी रुग्णालयात चार रुग्ण,चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच रुग्ण,आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तीन रुग्ण,तर गोंदिया येथील खासगी रुग्णालयातही काही रुग्ण उपचार घेत आहेत.शनिवारी ५ एप्रिल च्या सकाळी नऊ वाजल्यापासूनच विषबाधा झाल्याने अनेक रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. दिवसभर त्यांना उपचार दिले गेले.मात्र रविवारी ६ एप्रिलच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना लगेच गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दिली आहे.माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बोपचे यांनी चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला भेट देत रुग्णांची विचारपूस केली.
लग्नसोहळ्याच्या जेवणातून झालेल्या विषबाधेच्या धक्कादायक घटनेमुळे बबईवासी चांगलेच दहशतीत आहे.लहान चिमुकल्यांपासून तर वृद्धांना विषबाधा झाली आहे.या गंभीर घटनेची आरोग्य विभागाने काल रविवारी ६ एप्रिलला दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी विनोद चौहान यांच्या मार्गदर्शनात २८ रुग्णांची तपासणी केली.यात २६ रुग्ण सौम्य विषबाधा झालेले आहेत; तर दोन रुग्णांवर कॅम्पमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.या कॅम्पला अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी भेट दिली व घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!