Friday, June 26, 2026
Homeदेसाईगंजरोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी व रोजगार सेवकांचा मेहनताना त्वरित देण्याची मागणी….-अन्यथा...

रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी व रोजगार सेवकांचा मेहनताना त्वरित देण्याची मागणी….-अन्यथा कामबंद आंदोलन…-गडचिरोली ग्रामरोजगार सेवक संघटनेचे उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली):- संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात  रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. कामावर जाणाऱ्या मजुरांची मजुरी व कामावर देखरेख करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचा केलेला मेहनताना थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता थकलेली मजुरी व ग्रामरोजगार सेवकांचा मेहनताना त्वरित देण्यात यावा; अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा गडचिरोली जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने गडचिरोली उपमुख्यकार्यकारी अधिकारी (रोहयो) यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या रोजगार हमीच्या कामावर जाणारे गोर-गरीब नागरिक असुन अनेकांची स्थिती हातावर आणून पानावर खाण्याजोगी आहे.अनेक मजुर अल्पभूधारक शेतकरी,शेतमजूर असुन येणाऱ्या मिळकतीवर शेतीचे नियोजन तसेच घरची आर्थिक स्थिती सांभाळत असतात.सद्यास्थितीत शेतीचा हंगाम जोमात असुन या करीता खते,रोवणी,निंदण, किटकनाशके घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते.अशातच केलेल्या रोजगार हमीची मजुरी थकल्याने नियोजन करायचे कुठुन?याच विवंचनेत शेतकरी,शेतमजूर सापडले असुन मजुरी थकल्याने शेतकामे तसेच आर्थिक देवाणघेवाणीची मोठी गंभीर समस्या उभी ठाकली आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता थकलेली मजुरी तसेच ग्रामरोजगार सेवकांना मिळणारा मेहनताना यथाशिघ्र देण्यात यावा; अन्यथा  जिल्ह्यात ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतिने कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिपक प्रधान,सचिव मंगेश फुकटे, ग्रामरोजगार सेवक जालधर बोदेले,अमोल लाडे, प्रकाश बावणे,संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!