- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमासाठी स्कूटीने निघालेल्या आईवर काळाने झडप घालून अर्ध्यावरच श्वास रोखला,तर मुलगी थोडक्यात बचावून गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शुक्रवार ३ एप्रिल रोजी गोंदिया तालुक्याच्या दासगाव परिसरात दुपारच्या सुमारास घडली.दासगाव परिसरात रेतीने भरलेल्या टीप्परने स्कूटीला जोरदार धडक दिली.यात रामेश्वरी धनलाल नागपुरे वय ४५ वर्षे,रा.कटंगी(कला)असे अपघातात मृत पावलेल्या महिलेचे नाव असून मुलगी वैष्णवी गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामेश्वरी नागपुरे यांच्या सासू मयत झाल्याने त्या मुलीला घेऊन स्कूटीने मध्य प्रदेशच्या आरंभा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या.या दरम्यान गोंदिया तालुक्याच्या दासगाव गावाजवळ येताच एमएच ४० बीएच ८०८० क्रमांकाच्या रेतीने भरलेल्या व भरधाव वेगात असलेल्या टीप्परने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की रामेश्वरी नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला.मुलगी काही अंतरावर कोसळल्याने गंभीर जखमी झाली.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.टीप्पर चालकास चांगलेच बदडवून चक्काजाम आंदोलन केले व मार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध व्यक्त केला.दरम्यान,परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकास ताब्यात घेऊन तणावपूर्ण स्थिती आटोक्यात आणली.
- Advertisement -

