Saturday, September 5, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराहुल गांधी पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील; असे म्हणताच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ...

राहुल गांधी पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील; असे म्हणताच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पंकज कुमुदचंद्रा फडणीस यांनी राहुल गांधीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती.पंकज फडणीस
 हे अभिनव भारत काँग्रेस या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकरांबद्दल केल्या जाणाऱ्या बालिश आणि बेजबाबदार विधानांमुळे गोंधळ होतो,असा मुद्दा त्यांनी याचिकेत नमूद केला होता व राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वाचन करावे आणि स्वतःचे ज्ञान वाढवावे,असे निर्देश न्यायालयाने त्यांना द्यावेत,असे पंकज फडणीस यांनी याचिकेत मागणी केली होती.त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.न्यायालय म्हणाले, “तुम्ही तुमच्या याचिकेत विनंती केली आहे की,आम्ही त्यांना निर्देश द्यावेत की,त्यांनी व्यक्तिशः अभ्यास करावा आणि तुमच्या याचिकेनुसार वाचन करावे,अशी सक्ती न्यायालय करू शकत नाही?”, असा उलट सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला.त्यानंतर याचिकाकर्ता न्यायालयात म्हणाला की, “ते विरोधी पक्षनेते आहेत आणि ते गोंधळ तयार करत आहेत.जर ते पंतप्रधान झाले,तर ते कहरच करतील.” याचिकाकर्त्याच्या पंतप्रधान होण्याबद्दलच्या युक्तिवादावर न्यायालय म्हणाले, “आम्हाला माहिती नाही.तुम्हाला माहिती आहे का की ते पंतप्रधान होणार आहेत?” तुम्ही कशावरून सांगताय की ते पंतप्रधान होणार?न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की,वीर सावरकरांचे पणतू आधीच पुण्यातील न्यायालयात गेले आहेत.त्यांनी बदनामीची(मानहानी) याचिका दाखल केली आहे.याच मुद्द्यावर तिथे अगोदरपासून सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती,पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावली,असे सांगत न्यायालयाने फडणीस यांचीही याचिका फेटाळून लावली व राहुल गांधी यांना दिलासा दिला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!