Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय महामार्गांच्या दुरावस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून घेतली दखल.. - कंत्राटदाराविरुद्ध ‘कारणे दाखवा’ नोटीस..

राष्ट्रीय महामार्गांच्या दुरावस्थेची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून घेतली दखल.. – कंत्राटदाराविरुद्ध ‘कारणे दाखवा’ नोटीस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरावस्थेची स्वतःहून(सुमोटो)दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून आज, शुक्रवार ३१ ऑक्टोंबरला सुनावणी घेतली.खराब रस्त्यांच्या गंभीर प्रश्नावर कोणाचीही गय केली जाणार नाही,असा कडक इशारा त्यांनी यावेळी दिला.शासकीय निविदेनुसार महामार्गाचे बांधकाम,डांबरीकरण,दुरुस्ती आणि देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर असतांना,सदर रस्त्यांची दुरावस्था झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.या गंभीर निष्काळजीपणाची स्वतः दखल घेत जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध प्रकरणाची नोंद करून आज सुनावणी घेतली.ही कारवाई ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३’ मधील कलम १५० ते १५२ अंतर्गत करण्यात आली आहे.या कलमांनुसार सार्वजनिक सुव्यवस्था,सुरक्षितता आणि सुविधांवर प्रतिकूल परिणाम घडविणाऱ्या उपद्रवात्मक कृतींवर दंडाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत.सदर सुनावणीदरम्यान “शासकीय कामांमध्ये गुणवत्ता आणि जबाबदारी  बंधनकारक असून सार्वजनिक कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांविरुद्ध नियमितपणे सुनावणी घेवून कठोर कारवाई केली जाईल”, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!