Friday, September 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात 'ती' काहीतरी पुटपुटली अन् चमत्कारच घडला..! -...

महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात ‘ती’ काहीतरी पुटपुटली अन् चमत्कारच घडला..! – विजयानंतर डोळ्यात अश्रू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.नवी मुंबईत काल गुरुवारी झालेल्या थरारक उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ५ गळी (फलंदाज)राखून मात केली. ऑस्ट्रेलिया संघाने दिलेले ३३९ धावांचे लक्ष्य भारताच्या संघाने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ९ चेंडू राखून पूर्ण केले.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९ षटके आणि ५ चेंडूंत ३३८ धावा करुन माघारी परतला. फीबी लिचफील्ड हिने ११९ धावांची खेळी केली,तर किम गार्थ आणि ॲनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.प्रत्युत्तरादाखल,जेमीमा रॉडरिग्जच्या नाबाद १२७ आणि हरमनप्रीत कौर हिच्या ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिलेले मोठे लक्ष्य भारताला पार करता आले.अश्यातच ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात अश्रू होते.हे अश्रू आनंदाचे होते,विश्वासाचे होते आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरल्याचे होते.३३९ धावांचा डोंगर गाठण्यासाठी जेव्हा भारतीय संघ मैदानावर उतरला,तेव्हा चाहत्यांना कुठेतरी वाटत होते की,ऑस्ट्रेलियासारख्या संघासमोर कदाचित हे अशक्य आहे.पण,एका बाजूला उभी असलेल्या जेमिमाला मात्र हे शक्य वाटत होते.दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या,पण जेमिमाचा आत्मविश्वास वाढत राहिला.जेमिमाने शतक पूर्ण केल्यानंतरही तिने कोणताही आनंद व्यक्त केला नाही, कारण तिला माहीत होते की या शतकापेक्षा भारताचा विजय महत्त्वाचा आहे.देशाचा विजय,जो संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल.झालेही तसेच.जेमिमा शेवटपर्यंत क्रीझवर टिकून राहिली.तिने संयमही दाखवला आणि जोशही.अखेरीस १२७ धावांची नाबाद खेळी करून फायनलचे तिकीट मिळवलेच.सामन्यादरम्यान जेव्हा कॅमेरा जेमिमाकडे गेला,तेव्हा ती काहीतरी पुटपुटतांना ऐकू आली.ती वरच्या देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत होती. सामना संपल्यावर जेव्हा स्टेडियम भारत आणि जेमिमाच्या घोषणेने निनादले,तेव्हा जेमिमाच्या डोळ्यांतून अश्रू ओसंडून वाहिले.सामना जिंकल्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब स्वीकारतांना जेमिमा म्हणाली, ‘मी येशूचे आभार मानू इच्छिते,कारण मी हे माझ्या बळावर करू शकले नसते.मी माझ्या आई, वडील,प्रशिक्षक आणि या संपूर्ण काळात ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते.’ ती म्हणाली की,माझे बस एकच लक्ष्य होते.भारताला हा सामना जिंकवून देणे,कारण आम्ही अनेकदा अशा परिस्थितीत हार पत्करली होती.
जेमिमा म्हणाली की,आजचा दिवस माझ्या ५० किंवा १०० धावांबद्दल नव्हता.आजचा दिवस भारताला जिंकवून देण्याबद्दल होता.मला माहीत आहे की,मला काही संधींवर नशिबाची साथ मिळाली,पण मला वाटते की प्रभूने(देवाने)सर्वकाही योग्य वेळी दिले.जेमिमा म्हणाली की,सुरुवातीला मी फक्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतःशी बोलत होते.पण शेवटी,मी… मी बायबलमधील एक ओळ पुन्हा पुन्हा म्हणत होते,कारण माझी ऊर्जा संपली होती,मी खूप थकून गेले होते.ती ओळ होती, ‘फक्त स्थिर राहा,देव तुमच्यासाठी लढेल…’ मी फक्त उभी राहिले आणि ‘प्रभू येशू’ ने माझ्यासाठी लढाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!