उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
देसाईगंज :- शहरातील व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरदचंद्र पवार गट) धुरा सांभाळण्यासाठी व पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी काल दिनांक-२८ जुलै २०२३ रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज येथील विश्रामगृहात मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पाडण्यात आली.
बैठकी दरम्यान, पूर्वी जे झालं ते विसरून नव्याने व जोमाने सर्वसामान्य जनतेची असलेली कळकळ लक्षात घेता; जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्त्या करणे आवश्यक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गर्शनाखाली,मान्यतेने व कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके तर शहराध्यक्ष अशोक माडावार यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली आहे.
मागील काही दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.मात्र शरद पवार यांचे समर्थक म्हणून पदाधिकारी,कार्यकर्त्यांची,सर्वसामान्य नागरिकांची देसाईगंज तालुक्यातील विश्रामगृह येथे लागलेली रीघ पाहून अनेकांचा आत्मविश्वास अधिक उंचावला आहे. काहीजण पैश्याच्या हव्यासापोटी इकडून तिकडे उडी मारतांना दिसून येतात.अशातच सतत व निरंतर पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न पटणारे कृत्य आजच्या घडीला दिसून येत असेल तरीही शरद पवारांशी अनेकांची जुळलेली नाळ कुणीही तोडूच शकणार नाही; हे काल झालेल्या बैठकी दरम्यान दिसून आले आहे.त्यानुसारच सदर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सदर नियुक्त्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्याम धाईत,हेमराज परशुरामकर,ओम शर्मा, नामदेव मेश्राम,तुलाराम लाकडे,हितेश गजघाटे, कपिल बोरकर,रोशन शेंडे,सत्यवान रामटेके,अविनाश राघोर्ते, वेंकटेश ताडपल्लीवार,वनमाला पुस्तोडे, द्रौपदीताई सुखदेवे,शीलाताई परशुरामकर,नजमा पठाण,प्रतिभाताई साखरे,कल्पनाताई वासनिक, वैष्णवीताई आकरे,पुष्पाताई सुरकाट,दलेरभाऊ वासनिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
