Wednesday, September 9, 2026
Homeमुंबईराष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी गोळीबार हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली..

राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी गोळीबार हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची काल,शनिवारी १२ ऑक्टोंबर रोजी रात्री साडे नऊ च्या सुमारास मुंबईतील वांद्रे येथील खेर नगर येथील आमदार पुत्र झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.सिद्दिकी यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये काँग्रेस सोडली आणि अजित पवार यांच्या गटात सामील झाले होते.
सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या आरोपींची ओळख पटली असून एकाचे नाव गुरमैल बलजीत सिंह असून तो हरियाणाचा रहिवाशी आहे. तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील असून त्याचे नाव धर्मराज राजेश कश्यप असे आहे. त्याचे वय १९ आहे.तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.त्याचे नाव शिव कुमार गौतम उर्फ शिवा असून तोही बहराइच येथील राहणारा आहे.
पोलिसांनी ३ पैकी २ शूटर्सना अटक केली आहे. एकजण फरार आहे.एक शूटर हरियाणाचा तर दोघे उत्तर प्रदेशातील बहराइच चे आहेत.ते ४० दिवस मुंबईत थांबले होते आणि सिद्दिकी यांचे घर आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी करीत होते.सिद्दिकी यांना वाय-सुरक्षा मिळाली होती; मात्र घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत एकही हवालदार नव्हता.रस्त्यावरील दिवे आणि सीसीटीव्हीही बंद करण्यात आले होते.
ऑटोमध्ये आलेल्या ३ शूटर्सनी दोन बंदुकांमधून ६ राऊंड फायर केले.बाबा सिद्दीकी यांना तीन गोळ्या लागल्या.त्यांच्या पोटात दोन आणि छातीवर एक गोळी लागली.तिघांनी तोंडाला रुमाल बांधले होते.
बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या आरोपींकडून मुंबई गुन्हे शाखेने २८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपींचा आंतरराष्ट्रीय टोळीशीही संबंध असू शकतो. त्याची पडताळणी केली जात आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना आज किल्ला न्यायालयात हजर करून १४ दिवसांची कोठडी मागितली आहे. आरोपी धर्मराजने आपले वय १७ सांगितले आहे. स्वतःला अल्पवयीन असल्याचे सांगितले.मात्र आधार कार्डनुसार त्याचे वय २१ वर्षे आहे.धर्मराजच्या दाव्यावर न्यायालयाने त्याचे आधार कार्ड मागितले आहे. जेणेकरून त्याच्या वयाची पडताळणी करता येईल.लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.मात्र, सदरची पोस्ट सोशल मीडिया वर कुणी टाकली याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!