Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेचे एकेचाळीसावे सत्र संपन्न... - एकेचाळीसाव्या सत्रात मोहटोला(किन्हाळा)चे केवळराम बगमारे...

नाट्यश्री कविता स्पर्धेचे एकेचाळीसावे सत्र संपन्न… – एकेचाळीसाव्या सत्रात मोहटोला(किन्हाळा)चे केवळराम बगमारे विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे एकेचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी केवळराम बगमारे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “माझी सौभाग्यवती” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
केवळराम बगमारे हे मोहटोला (किन्हाळा), ता.देसाईगंज,जिल्हा-गडचिरोली येथील रहिवासी असून ते झाडीपट्टीतील प्रसिद्ध तबलावादक व नवोदित कवी आहेत.झाडीपट्टीतील अनेक नाटकातून त्यांनी संगीतही दिलेले आहे.त्यांना भजनाचाही छंद आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. एकेचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा. पी.एस.बनसोडे,राजेंद्र यादवराव सोनटक्के,रोहिणी पराडकर,पुरुषोत्तम दहिकर,अजय राऊत,पुनाजी कोटरंगे,चरणदास वैरागडे,लता शेंद्रे,तुळशीराम उंदीरवाडे,रोशन येमुलवार,मुर्लीधर खोटेले,संगीता ठलाल,ऊकंडराव नारायण राऊत,यामिनी मडावी, वंदना सोरते,माधुरी अमृतकर,रेखा दिक्षित,वामनदादा गेडाम,कृष्णा कुंभारे,सोनाली रायपुरे-सहारे,खुशाल म्हशाखेत्री,मधुकर दुफारे,वंदना मडावी,सुजाता अवचट,सुनिल चडगुलवार,संगीता रामटेके,केवळराम बगमारे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
एकेचाळीसाव्या सत्रातील पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!