उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डिसेंबर २०२१ मध्ये दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होत्या.येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असतानाही ममता बॅनर्जी बसून राहिल्या.काही सेकंदांनी त्या अचानक उठल्या आणि दोन ओळी गाऊन गप्प झाल्या यानंतर तिथून निघून गेल्या.
ममता बॅनर्जींच्या या वर्तनाने संतप्त झालेले भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी मार्च २०२२ मध्ये कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले होते.ममता बॅनर्जी यांनी जानेवारी २०२३ मध्ये विशेष MP-MLA कोर्टात त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या समन्सला आव्हान दिले.त्यावर न्यायालयाने दंडाधिकार्यांना तक्रारीवर नव्याने विचार करण्यास सांगितले होते, तर ममता यांची तक्रार रद्द करण्याची मागणी होती.
MP-MLA न्यायालयातून त्यांच्या बाजूने निर्णय न मिळाल्याने ममता यांनी उच्च न्यायालयात अपील केले, ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याऐवजी तक्रार रद्द करण्याची मागणी केली. परंतु, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ही तक्रार रद्द करण्यास नकार दिला.