Friday, August 28, 2026
Homeगडचिरोलीरात्री १० नंतर पोंगा; तक्रारीची वाट न बघता थेट होणार कारवाई... -...

रात्री १० नंतर पोंगा; तक्रारीची वाट न बघता थेट होणार कारवाई… – निवडणूक आयोगाने लादले निर्बंध…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर उमेदवार रिंगणात आहेत.उद्या ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून चिन्ह वाटप होणार आहेत.त्यानंतर ५ नोव्हेंबरपासून प्रचारतोफा धडाडणार आहेत.त्यामुळे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराचे विविध माध्यम वापरणार असून नियमांचे उल्लंघन होणार नाही; याची काळजी घ्यावी लागणार आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथक तयार करण्यात आले असून ते कारवाईचा बडगा उगारणार आहेत.
विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोंबर पासून जाहीर झाली असून २५ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे.ही निवडणूक विना अडथळा व शांततेने पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या काळात लाऊडस्पीकर वापरण्यावर आयोगाने निर्बंध घातले आहेत.या नियमानुसार रात्री दहा वाजतानंतर लाऊडस्पीकर लावल्यास कारवाई होऊ शकते. विधानसभा निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून शहर तसेच ग्रामीण भागातही स्पीकरद्वारे प्रचारयंत्रणा राबविली जाते.
याच अनुषंगाने निवडणूक आयोगाने काही निर्बंध लागू केले आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत कोणत्याही वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून त्याचा वापर फक्त सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच तोही संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी यांची रीतसर परवानगी घेऊनच करता येणार आहे; शिवाय,असा वापर करत असतांना वाहन चालू ठेवून ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
सर्वप्रकारच्या ध्वनिक्षेपकाच्या वापरास वाहनावर बसवून किंवा अन्य प्रकारे दररोज सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी राहील.सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणुकीचे किंवा ध्वनिक्षेपकाचे परवानगी विवरण निवडणूक निर्णय उमेदवार वापराचे मतदारसंघ अधिकारी व जवळच्या पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक राहील.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.याचे कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंडविधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.हा आदेश १५ ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू राहणार आहे.
रात्री दहा वाजतानंतर लाऊडस्पीकर लावल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेवून राहणार आहे.तक्रारीची वाट न बघता थेट कारवाई करणार आहे. त्यामुळे लाऊडस्पीकर लावताना योग्य काळजी घेणे बंधनकारक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!