Saturday, October 24, 2026
Homeमुंबईराज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर..-शेतकरी,महिला,युवा वर्गांसाठी विविध योजना…

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर..-शेतकरी,महिला,युवा वर्गांसाठी विविध योजना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज,२८ जून रोजी अजित पवार यांनी सादर केला.राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या अतिरिक्त अर्थसंकल्पामधून महिला,शेतकरी,युवा वर्ग,वारकरी,विद्यार्थ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

सन २०२३-२४ पासून ‘लेक लाडकी’ योजनेची सुरुवात होणार आहे.मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळतील.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत.यासाठी दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधी खर्च होणार आहे.

महिलांसाठी पिंक ई रिक्षाची घोषणा करण्यात आली आहे.१७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार आहे.’मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेमधून वर्षाला घरगुती तीन गॅस सिलेंडर मोफत देणार मिळणार असून ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ होणार आहे. लखपती दिदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ७ लाख नवीन गटांची

स्थापना होणार आहे.तसेच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरुन ३० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.दिनांक-१ मे,२०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नाव,आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै,२०२२ पासून १५ हजार २४५ कोटी ७६ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.नोव्हेंबर-डिसेंबर,२०२३ मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या २4 लाख ४७ हजार शेतकऱ्यांना २ हजार २५३ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत होणार आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत एकूण ९२ लाख ४३ हजार शेतकरी कुटुंबांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना-दरवर्षी १० लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ – प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा १० हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन मुंबई,पुणे,नागपूर,अमरावती,यवतमाळ, कोल्हापूर,छत्रपती संभाजीनगर,कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे,येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता ‘स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी’ मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित- ग्रामीण भागात ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन- १५ ते ४५ वयोगटातील १८ हजार ९८० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी),महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) इत्यादी संस्थांमार्फत एकूण २ लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण,संशोधन व नवउपक्रम केंद्रांसाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी असा एकूण १०० कोटी रुपयांचा निधी.शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनांसाठी १०० कोटी रुपये निधीची तरतूद. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन २०२४-२५ पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू इतर मागास वर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ८२ शासकीय वसतीगृहे स्थापन करण्यास मंजूरी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!