Friday, July 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअल्पवयीन मुले-मुलींनो सावधान..! अन्यथा २५ वर्षे  होईपर्यंत मिळणार नाही 'लायसन्स'..

अल्पवयीन मुले-मुलींनो सावधान..! अन्यथा २५ वर्षे  होईपर्यंत मिळणार नाही ‘लायसन्स’..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- अठरा वर्षे वयोगटाखालील मुले-मुली दुचाकी चालविताना आढळल्यास २५ हजार रुपये दंडासह २५ वर्षे वय होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये; असे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी काढले.त्यासंबंधित त्यांनी सर्व उप प्रादेशिक कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.त्यामुळे आता सुसाट तरुण आणि तरुणींनी वेळीच सुधारण्याची गरज आहे.

मोटर वाहन कायद्यातील (२०१९) तरतुदींनुसार राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आदेश काढले आहे.त्यात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळल्यास त्या मुलाचे पालक किंवा गाडी मालकास तीन वर्षे कैद २५ हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे.अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी दुचाकी चालवित असल्याचे निदर्शनास आले तर वयाची २५ वर्षे पूर्ण करेपर्यंत त्यांना वाहन परवाना देऊ नये; असेही आदेशात बजावले आहे.या तरतुदींची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या आहेत.

दुचाकी चालविण्याचा परवाना वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतरच दिला जातो.परंतु अल्पवयीन असताना ५० सीसीपेक्षा जास्त सीसीचे वाहन चालविताना आढळल्यास वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालकाचा परवाना देण्यात येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!