उद्रेक न्युज वृत्त :- राज्यसभेच्या २२५ पैकी ७५ खासदार क्रिमिनल आहेत.यातील ४१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर ३२ नेते अल्पशिक्षित आहेत.२७ जण करोडपती आहेत.उर्वरित प्रत्येकाची संपत्ती सरासरी ८०.९३ कोटी आहे.
समाजाच्या सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांचे संसदेला मार्गदर्शन मिळावे.त्यांच्या अभ्यासातून देशाचे धोरण ठरविण्यास मदत व्हावी; यासाठी निवडक लोकांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात निवड केली जाते.देश स्वातंत्र झाल्यानंतर अशा पद्धतीने निवड झालेल्या अनेकांनी चांगले कामे केले.अनेकांना मंत्रिपदी संधीही मिळाली. काहींनी सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक,उद्योग, शैक्षणिक,आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करून विकासात योगदान दिले.
पण,१९९० नंतर या पदाच्या प्रतिष्ठेला काहीशी उतरती कळा लागली.कारण उद्योगपती,कायदेतज्ज्ञ, कलाकार,खेळाडू व निवडणुकीत पडलेल्यांची बोली लावून वर्णी लावली जात आहे.यातून पक्षासाठी मान, धन अन् मतदान मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अलीकडच्या काळात तर या पदाची गरिमा अधिकच खालावत चालली आहे.कारण सर्वोच्च गणल्या जाणाऱ्या या सभागृहात गुन्हे दाखल असलेल्यांचा प्रवेश होऊ लागला आहे.असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात राज्यसभा खासदारांचा सिटी स्कॅन समोर आणला आहे.याविषयीचा अहवाल एडीआरने प्रसिद्धी केला आहे.यात २२५ पैकी २७५ सदस्यांनी (३३ टक्के) आपल्यावर गुन्हे
दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. यातील ४१ जणांवर (१८ टक्के) गंभीर गुन्हे आहेत. दोघांवर खुनाचे आरोप आहेत.चौघे खुनाच्या प्रकरणात संशयित आहेत.तसेच चार जणांनी महिलांवर अत्याचार केले आहेत.
पक्षात भाजप; राज्यात महाराष्ट्र आघाडीवर 👇
गुन्हेगारी प्रकरणात सर्वाधिक भाजपचे ३५, काँग्रेसचे २० खासदार आहेत.तर तृणमूल काँग्रेसचे सहा,राष्ट्रीय जनता दलाचे आठ,कम्युनिस्ट पक्षाचे सहा,आपचे चार, वायएसआरसीपीचे सहा व राष्ट्रवादीच्या तीन खासदारांचा समावेश आहे.यामध्ये महाराष्ट्रातील १२, बिहारामधील १०, उत्तर प्रदेशमधील सात सदस्य आहेत.
अनेक जण अल्पशिक्षित 👇
राज्यसभेत उच्चशिक्षित प्रतिनिधी असावेत; असा पायंडा आहे.पूर्वी तो पाळला जात होता.परंतु, अलीकडच्या काळात याला तडा गेल्याचे पाहावयास मिळते.तिघे फक्त आठवी पास आहेत.नऊ खासदार केवळ दहावी उत्तीर्ण झाले आहेत.तर २० सदस्य बारावी शिकले आहेत.४७ जण पदवीधर झाले आहेत. १११ जणांनी उच्च पदवी शिक्षण घेतले असून ३० जण पीएच.डी.धारक आहेत.पाच जणांकडे अभियांत्रिकीची पदविका आहे.
विश्वंभर चौधरी – ज्येष्ठ विचारवंत 👇
काही सदस्यांवर आंदोलनाचे गुन्हे आहेत.अनेकांवर गंभीर गुन्हे आहेत.खरे तर याचे सविस्तर वर्गीकरण करण्याची गरज आहे.यातून ज्यांनी गंभीर गुन्हे केले आहेत; त्यांचे सदस्यत्व रद्द करावे.पण सरकार याबाबत गंभीर नाही.अशी तरतूद असणारा कायदाच करावा; अशी आमची मागणी आहे.पण याकडे कोणतेच सरकार लक्ष देत नाही किंबहुना टाळाटाळ करते.सध्याच्या काळात शिक्षण महत्त्वाचे आहेच; पण कमी शिकलेल्या सदस्यांची सद्विवेकबुद्धी जागृत व सामान्यांप्रती संवेदनशीलता असेल तर ते चांगले काम करू शकतात.
(साभार – पुढारी वृत्त)