Sunday, September 6, 2026
Homeनागपूरराज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे.त्यानुसार,पिडीतेने पोलिसांत तक्रार दाखल केली.अजय सदाशिव सलामे वय ३८ वर्षे,रा.छोरिया लेआउट,रामटेक,जि.नागपूर असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी रामटेक पोलिसांनी अजय सलामे व एका महिलेच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता(बीएनएस) कलम ६९,३५१(२),३(५)अन्वये गुन्हा दाखल केला आहे; मात्र,अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून संपूर्ण आरोपांची पडताळणी केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.अजय सलामे हा सध्या राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचा अंगरक्षक असून तो यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांचाही अंगरक्षक होता.
अजयने पिडीत महिलेला लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध जुळताच पिडीत महिलेशी संपर्क तुटला.मात्र,पिडीत महिलेने बोलणे बंद केल्याने त्याने फोटो व व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली.पीडित महिला ही रामटेक शहरातील रहिवासी आहे.तर प्रकरणातील सहआरोपी महिला ही सुद्धा रामटेक शहरातीलच आहे.सहआरोपी महिलेने पीडितेच्या मुलांचे नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.त्यामुळे,अजय सलामे व महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे,पीडितेला न्याय मिळावा म्हणून अंगरक्षक अजयच्या पत्नीने पीडितेला सोबत घेऊन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेतली व त्यांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला.त्यानंतर दोघींनी रामटेक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांची भेट घेतली व तक्रार दाखल केली. प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यावले व राजकुमार थोरात यांच्याकडून सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!