Wednesday, July 15, 2026
Homeनागपूरराजस्व निरीक्षकासह खाजगी इसम ३ हजाराची लाच घेतांना अटकेत..

राजस्व निरीक्षकासह खाजगी इसम ३ हजाराची लाच घेतांना अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नुकतेच चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा स्थापत्य अभियंता व खाजगी इसमास १ लाख ३० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारतांना चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडुन अटक केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आता नागपूर शहर महानगरपालिकेच्या राजस्व निरीक्षक व खाजगी इसमास ३ हजार रुपयांची लाच घेतांना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.प्रमोद वसंतकुमार मोगरे वय ५० वर्षे,नागपूर महानगरपालिका,हनुमान नगर(झोन क्र.३),व खाजगी इसम राकेश नरेन्द्र दोडके वय ३४ वर्षे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्रकरणातील तक्रारदार यांनी रामेश्वरी परिसरात एक फ्लॅट खरेदी केला होता.या फ्लॅटचा टॅक्स स्वतःच्या नावे करण्यासाठी त्यांनी हनुमान नगर झोन कार्यालयात कागदपत्रे जमा केली होती,या कामाच्या व्हेरीफिकेशनसाठी आलेल्या कर्मचाऱ्यापैकी राकेश दोडके याने तक्रारदाराला फोन करून सांगितले की, तुम्हाला दरवर्षी ४ हजार ५०० रुपये टॅक्स लागणार आहे, तो कमी करून १ हजार ८०० रुपये करून द्यायचा असेल तर मला आणि माझे साहेब प्रमोद मोगरे यांना ३ हजार ५०० रुपये द्यावे लागतील.तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूरकडे तक्रार नोंदवली.सदर तक्रारीच्या अनुषंगाने सापळा पडताळणी करण्यात आली.त्यामध्ये ३ हजार ५०० रुपयांच्या मागणीपैकी तडजोडीनंतर ३ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.त्यानुसार,रचलेल्या सापळ्यात  राकेश दोडके याला प्रमोद मोगरे यांच्या सांगण्यावरून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपिंविरुद्ध पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरू आहे.
सदर यशस्वी सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि  विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक विवेक पडघान, मपोहवा कांचन गुलबासे,पोशि.विकेश राउत,पोशि. सचिन किव्हेकर आणि चापोशि प्रिया नेवारे यांचेसह  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जनतेला आवाहन👇
शासकीय कामासाठी एखाद्या लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यांच्या विरुद्ध निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
१. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरध्वणी क्र. 0712-2561520,
२. टोल फ्री क्रमांक : 1064 / व्हॉटसॲप क्र. 9067671064
३. डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र. 9923185566
४. श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो.क्र.7038436441
५. विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो.क्र.9923142569
६. राजीव कर्मलवार,पोलीस निरीक्षक,वाचक लाप्रवि नागपूर मो.क्र.9021452760
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!