- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नदी परिसरात आज,गुरुवार २६ फेब्रुवारीच्या सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवादी ठार झाले असून परिसरात अजूनही सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरू आहे. दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत,असे बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पट्टलिंगम यांनी स्पष्ट केले.
इंद्रावती नदीच्या काठावरील घनदाट जंगलात नक्षलवादी छपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.त्या माहितीच्या आधारे विविध संयुक्त सुरक्षा पथके नक्षलविरोधी कारवाईसाठी गेले होते.यावेळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.त्यासह घटनास्थळी एसएलआर रायफल,आयएनएएसएएस रायफल,१२ बोअर रायफल,स्फोटके आणि इतर नक्षलवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.
- Advertisement -

