Tuesday, September 1, 2026
Homeगोंदियारस्त्याने जात असलेल्या महिलेचा पाठलाग करून विनयभंग; आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास..

रस्त्याने जात असलेल्या महिलेचा पाठलाग करून विनयभंग; आरोपीस तीन वर्षांचा सश्रम कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-एका महिलेला रस्त्यात गाठून विनयभंग केल्याप्रकरणी गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.जोशी यांनी साक्षीदारांचे जबाब तसेच प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आरोपीला भारतीय न्यायसंहिता कलम ७४ अंतर्गत दोन वर्षाचा सश्रम कारावास,तसेच पाच हजार रुपये दंड (दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास),कलम ७५ (२)अंतर्गत एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड(दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास)असा एकूण तीन वर्षांचा सश्रम कारावास, तसेच सहा हजार रुपये दंडाची २६ नोव्हेंबरला शिक्षा ठोठावली आहे.सडक-अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव डेपो येथील ४९ वर्षीय सुभाष उर्फ मड्या श्रीराम मडावी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मागील वर्षाच्या १९ ऑक्टोंबर २०२४ रोजी ४५ वर्षीय पीडिता डोंगरगाववरून खुर्शीपार येथे पायी जात होती.तितक्यातच आरोपी सुभाष मडावी महिलेच्या मागे लागून तुझे नाव काय आहे,कोणत्या गावची,असे विचारून त्याने तिचा हात पकडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडुपात ओढत नेले व विनयभंग केला. पिडीतेने ओरड करताच परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव पीडितेला मडावीच्या तावडीतून सोडविले होते.त्यानुसार,पिडीतेने त्याच दिवशी देवरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक गीता मुळे यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध कलम ७४,७५(२),७८(२) अंतर्गत दोषारोपपत्र सादर केले होते.पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात,अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या देखरेखीत हवालदार ब्रिजलाल राऊत यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले. प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!