Saturday, March 15, 2025
Homeमुंबईरतन टाटा,धीरूभाई अंबानी कोट्यवधीचे साम्राज्य उभारणारे शून्यातून आले वर
spot_img

रतन टाटा,धीरूभाई अंबानी कोट्यवधीचे साम्राज्य उभारणारे शून्यातून आले वर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 मुंबई : जगभरातील अब्जाधिश आज अब्जावधी संपत्तीचे मालक आहेत.पण एक काळ असा होता;ज्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यात मोठा संघर्ष केला.अनेकांनी नोकरी करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

रतन टाटांची पहिली नोकरी
देशातील उद्योगपती रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टील जमशेदपूरमध्ये नोकरी केली होती.त्याआधी रतन टाटांनी टाटा मोटर्समध्ये नोकरी केली होती. या कंपनीत ते एक कर्मचारी म्हणून काम करत होते. ज्यावेळी टाटांनी पहिल्या नोकरीची ऑफर आली, त्यावेळी त्यांच्याकडे नोकरीसाठी बायोडाटाही तयार नव्हता.

धिरूभाई अंबानी

धिरूभाई अंबानींनी कोट्यवधींचं साम्राज्य उभारले. पण एकेकाळी ते अतिशय साधी नोकरी करीत होते.ते यमनमध्ये एका गॅस स्टेशनवर एक अटेंडेंट म्हणून नोकरी करत होते.ही त्यांची पहिली नोकरी होती.त्यावेळी त्यांना केवळ ३०० रुपये मिळत होते.काही काळात मेहनतीच्या जोरावर ते गॅस स्टेशनवर मॅनेजर झाले.त्यानंतर १९५७ मध्ये ते भारतात परतले.त्यानंतर त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला.हाच व्यवसाय नंतर रिलायन्स इंडस्ट्री बनला आणि २००६ मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमझ्ये धिरूभाई १३८व्या क्रमांकावर होते.

नारायणमूर्ती
भारतात IT सेक्टरचे जनक म्हणून ओळखले जाणारे इन्फोसिसचे फाउंडर नारायणमूर्ती यांची पहिली नोकरी रिसर्च असोसिएट होती.नारायणमूर्ती IIM अहमदाबादच्या एका फॅकल्टीसाठी काम करत होते.तिथेच ते चीफ सिस्टम मॅनेजर बनले.त्यानंतर त्यांनी एक सॉफ्ट्रॉनिक्स नावाची कंपनी सुरू केली.जी चालली नाही.त्यानंतर त्यांनी पुण्यात पाटणी कंप्यूटर सिस्टम्समध्ये नोकरी सुरू केली. त्यांना १० हजार रुपये वेतन मिळत होते.त्यानंतर १९८१ मध्ये त्यांनी ६ मित्रांसह इन्फोसिसची सुरुवात केली.ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ४.३ बिलियन डॉलर इतकी झाली.कंपनी सुरू करण्याचा विचार केला त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते.त्यावेळी पत्नीकडून त्यांनी काही पैसे घेऊन कंपनी सुरू केली.नारायणमूर्तींच्या घरातील एक खोली त्यांच्या कंपनीचे ऑफिस होते.

अशा प्रकारे परिस्थितीवर मात करून आज कोट्यधीश यांच्या यादीत सर्वांचे स्थान आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!