- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-रंगपंचमीचा उत्सव साजरा केल्यानंतर शरीरावरील रंग काढण्यासाठी गाव तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुटाळा येथे उघडकीस आली.सागर गहाणे वय १६ वर्षे व प्रणय गहाणे वय १३ वर्षे अशी तलावात बुडून मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.
आज सकाळच्या सुमारास रंग खेळून झाल्यावर फुटाळा येथील काही मुले गाव परिसरात असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेले होते.दरम्यान,सागर व प्रणय आंघोळीसाठी तलावाच्या पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली आणि डुग्गीपार पोलिसांना कळवले.घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.घटनेचा पुढील तपास डुग्गीपार पोलिसांकडून सुरू आहे.
- Advertisement -

