Friday, April 10, 2026
Homeगडचिरोलीयेत्या २९ जुलै रोजी जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटी पुर्तता विशेष मोहीम..

येत्या २९ जुलै रोजी जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटी पुर्तता विशेष मोहीम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या परंतु अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या,मंगळवार २९ जुलै २०२५ रोजी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोलीमार्फत ही मोहीम त्रुटी पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राबवली जात आहे.
अनु.जाती (SC),इमाव (ST),एसईबीसी (SEBC) व इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करून समितीकडे पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावांवर समितीने आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून १७ जुलै २०२५ पर्यंत बहुतांश प्रकरणांचा निकाल दिला आहे.तथापि, काही प्रकरणांमध्ये त्रुटी असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे शक्य झाले नाही.या पार्श्वभूमीवर,२९ जुलै रोजी “विशेष त्रुटी पूर्तता मोहीम” आयोजित करण्यात आली असून,ज्या विद्यार्थ्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,त्यांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,शासकीय आय.टी.आय.चौक,एल.आय.सी.मार्ग गडचिरोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी.
त्रुटी अभावी कोणतेही प्रकरण प्रलंबित राहिल्यास किंवा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदाराची असेल.त्यामुळे सर्व संबंधितांनी विहीत दिवशी आवश्यक त्या दस्तावेजांसह उपस्थित राहून कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर “जयंती महोत्सव”.. – उद्याला सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे उद्या,शनिवार ११...

मोबाइलवर बोलण्याच्या नादात बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कारने उडवले पती-पत्नीला..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाइलवर बोलण्याच्या नादात एका खासगी बँकेत शाखा व्यवस्थापक असलेल्या कार चालकाने दुचाकीने घरी परतणाऱ्या पती-पत्नीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती...

वेळ,पैसा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च वाचवायचा असेल तर लोकअदालतीचा घ्या लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रलंबित प्रकरणांच्या जलद व सामोपचाराने निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली यांच्या वतीने येत्या,...

आईच्या निधनानंतर वडिलाने लग्न करू नये म्हणून १९ वर्षीय मुलाने वडिलाची केली निर्घृण हत्या..

उद्रेक न्युज वृत्त :-नात्यांमधील वाढता दुरावा आणि संताप किती टोकाला जाऊ शकतो,याचे भीषण उदाहरण मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याच्या रुई गावात आज,गुरुवार ९ एप्रिल रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!