Tuesday, March 25, 2025
Homeनागपूरयूट्यूब पाहून स्वत:च केली प्रसूती; नागपूर अंबाझरी येथील घटना
spot_img

यूट्यूब पाहून स्वत:च केली प्रसूती; नागपूर अंबाझरी येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- गर्भवती असल्याची माहिती लपवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यूट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी नागपूरच्या अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे.हा प्रकार जेव्हा अल्पवयीन मुलीच्या आईला कळला तेव्हा त्या मुलीला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आले.सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.मात्र,अशा प्रकारे युट्यूबवर प्रसूतीचा प्रयत्न करणे हे धोकादायक असून मुलींच्या जीवावर बेतू शकते.

सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राने अत्याचार केल्यानंतर एक पंधरा वर्षाची मुलगी गर्भवती राहिली. तिने ही माहिती घरच्यांपासून लपवून ठेवली.नंतर युट्यूब पाहून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिला.प्रसूती झाली तेव्हा ती घरी एकटी होती.आई घरी आली तेव्हा तिला हा प्रकार कळताच मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान,पोलिसांनी मुलीच्या आईचा मोबाईल तपासला असता तिने हे धाडस युट्यूब बघून केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.मात्र,अल्पवयीन मुलीने अजून तरी याबद्दल पोलिसांना कोणतीही माहिती दिली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट सांगितले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवरून संबंधित मुलगी आरोपीच्या संपर्कात आली.त्यानंतर एक दोन महिन्याच्या चॅटिंगनंतर आरोपी मुलाने मुलीला एका परिसरात बोलावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.यातूनच ती मुलगी गर्भवती झाली.मात्र, मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा मृतदेह संशयास्पद ठिकाणी आढळला असल्याने घटनेला नवे वळण आले आहे. अशा प्रकारे युट्यूबवर प्रसूतीचा प्रयत्न करणे हे धोकादायक असून मुलींच्या जीवावर बेतू शकते असे तज्ञांचे मत आहे.कारण प्रसूती काळात काही लिटर ब्लड हे मातेच्या शरीरातून बाहेर जाते.तसेच,बाळाची नाळही आईच्या गर्भाशी जुळलेली असते त्यामुळे हा खूप गंभीर प्रकार असून मुलीने एकटीने हे सर्व केले असावे यावर डॉक्टरांचा विश्वास नाही. तसेच,आपल्याकडे कायदे आहेत पण त्याची नीट अंमलबजावणी होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.प्रसूती आणि गर्भपात करणे हे दोन्ही धक्कादायक प्रकार मुलींनी करू नये;असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेती तस्करांच्या मागे धावला वाघ; ट्रॅक्टरच्या ट्रालीत उडी घेतल्याने थोडक्यात बचावले मजूर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- 'रेती चोरीचा मामला अन् हळूहळू बोंबला' अश्या कथानक रेती तस्कर रंगवू लागले आहेत.रात्र असो की दिवस,चोरांसाठी सारखेच असतात. अशातच चंद्रपूर जिल्ह्याच्या...

खासदारांचे वेतन वाढ; २४ टक्के वाढ झाल्याने आता महिन्याकाठी ‘इतका’ मिळणार पगार..

उद्रेक न्युज वृत्त :-संसदीय कामकाज मंत्रालयाने आज,सोमवारी २४ मार्च रोजी अधिसूचना जारी करीत खासदारांच्या वेतनात २४ टक्के वाढ केली आहे.सदरचे वाढीव वेतन हे १...

पेट्रोलियम ऑईल कंपनीमध्ये आगीचा भडका..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीत(MIDC) आज,सोमवार २४ मार्चला दुपारच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ माजली.उन कडक असल्याने आगीने रौद्ररूप...

गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा शक्ती स्थापना व समाजप्रबोधन कार्यक्रम संपन्न… -सध्याची जनसुनावणी ही लोकशाहीला हरताळ फासणारी -प्रा.अनिल होळी

उद्रेक न्युज वृत्त  विशेष प्रतिनिधी/प्रियंका ठाकरे गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील गहूबोडी येथे काल,रविवार २३ मार्चला ‘गोंडी धर्मशक्ती सल्ला गांगरा’ स्थापना आणि समाजप्रबोधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!