Thursday, April 16, 2026
Homeगोंदिया'या' जिल्ह्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' अर्ज पडताळणीला सुरुवात.. - पहिल्यांदा चारचाकी...

‘या’ जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अर्ज पडताळणीला सुरुवात.. – पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाल्यापासून निकषात बसत नसलेल्या महिलांकडूनही लाभ घेण्याचा प्रकार शासनाच्या निदर्शनास आल्याने आता शासन स्तरावरून ठोस पावले उचलून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाच्या पडताळणीला सुरुवात झाली आहे.बरेच पात्र नसणारे लाभार्थीसुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत.त्यामुळे आता अर्जाची पडताळणी करून त्यांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.काल, शुक्रवारी गोंदिया जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला चारचाकी वाहने असणाऱ्या ४० लाभार्थी महिलांची यादी प्राप्त झाली आहे.याची पडताळणी करून अहवाल पाठविला जाणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र व अपात्र असलेल्या लाभार्थीची पडताळणी करतांना पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे.त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे,अशांची पडताळणी होईल. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी चारचाकी वाहन व नोकरीवर असलेल्या महिलांनीसुद्धा अर्ज केले होते.त्यांनी अनुदानाची उचलसुद्धा केली आहे.पण ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आता अशा लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यास सुरुवात करण्यात आली.बऱ्याच लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जासह खोटी कागदपत्रे जोडल्याचेसुद्धा पुढे आले.त्यामुळे अर्जासह जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.काल शुक्रवारी शासनाकडून जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला चारचाकी वाहने असणाऱ्या ४० लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली. या यादीतील नावांची पडताळणी करून माहिती शासनाला पाठविण्यात येणार आहे.त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!