Saturday, May 23, 2026
Homeचंद्रपूर..यानंतर सापडल्या; तर 'मकोका' अन् मालमत्ता जप्तीची कारवाई..

..यानंतर सापडल्या; तर ‘मकोका’ अन् मालमत्ता जप्तीची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्हा पोलिस प्रशासनाने चंद्रपूर,वरोरा,चिमूर, ब्रम्हपुरी,मूल,राजुरा आणि गडचांदूर या सर्व पोलीस उपविभागांतील सराईत गो-तस्करांची संपूर्ण माहिती संकलित केली असून जिल्ह्यात तब्बल २९३ सराईत गो-तस्करांची नोंद करण्यात आली आहे.अश्यातच जिल्ह्यात वाढत्या अवैध गोवंश तस्करी,कत्तल व मुक्या जनावरांवरील क्रूरतेला आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेत तस्करांना तंबी दिली आहे.यापुढे अवैध जनावरांची वाहतूक व गो-तस्करी करणाऱ्यांवर केवळ सामान्य गुन्हे दाखल न करता संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल व अश्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळणे कठीण होणार असून आरोपींना दीर्घकाळ तुरुंगवासाला सामोरे जावे लागेल. तसेच गो-तस्करीतून मिळवलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असून तस्करीसाठी वापरलेली वाहने थेट सरकारकडे जमा करण्यात येतील,असाही इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.जिल्हा पोलीस मुख्यालयातील आयोजित विशेष “ओळख परेड व प्रतिबंधात्मक कारवाई कॅम्प” जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने सराईत गो-तस्करांना तस्करीचे धंदे तात्काळ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक कायंदे पाटील,सचिन खेत्रे,स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय अमोल काचोरे यांचेसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस पथक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उभ्या ट्रकला कारची धडक; दोन महिलांचा मृत्यू,तर आठ जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घालून घडलेल्या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार २३...

पतीवर बिबट्याने झडप घालताच पत्नी गावाच्या दिशेने पळत सुटली; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शुक्रवारचा दिवस हा हिंस्त्र प्राण्यांच्या मानवाच्या शिकारीचा दिवस होता की काय?कारण की, काल शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात...

शाळांच्या सुट्ट्यात वाढ होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात सध्या उष्णतेने कहर केला आहे.राज्यातील अनेक शहरांवर सूर्य आग ओकत असून विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी हे शहर...

बाकीच्यांना तीन हजार दिले आणि आम्हाला कां नाही? – पात्र लाडक्या बहिणींना चिंता; तुम्हालाही मिळणार तीन हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे रखडलेला असतांनाच नुकताच पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!