- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मोफत इंटरनेट,त्यातच फोनवरील अमर्यादित संभाषणे आणि रिल्समुळे दिवस कसा काय निघून जातो; हे अनेकांना कळतच नाही.एकदा कां मोबाईलची सवय जडली,तर ती हाल्या-हाल्या सुटत नाही.अश्यातच आता सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल फोन आल्याने मोबाईलचा अतिवापर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.बरेच विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाइलचा अतिवापर करतांना दिसून येतात.अश्याच प्रकारे नर्सिंग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारी २१ वर्षीय तरुणी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाइलचा अतिवापर करू लागल्याने पालकांनी तिला रागावून मोबाइल काढून घेतला.यामुळे नाराज झालेली तरुणी कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची धक्कादायक घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.या प्रकरणी वडिलांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.विशेष म्हणजे,तरुणीचे वडील सहा वर्षांपूर्वी नागपूर पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत.
नागपूरच्या गोधनी रेल्वे परिसरातील सुमननगरी येथील रहिवासी २१ वर्षीय खुशी अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता सतत मोबाइलचा वापर करीत असल्याने पालकांनी तिला समजावून सांगितले आणि चार दिवसांपूर्वी म्हणजेच ११ सप्टेंबर २०२६ रोजी तिच्याकडील मोबाइल काढून घेतला.यामुळे नाराज झालेली खुशी रविवार १३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास घरी कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली.ती उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने पालक तसेच नातेवाइकांनी तिचा मित्र-मैत्रिणी तसेच इतरत्र ठिकाणी शोध घेतला.मात्र,तिचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता तसेच अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करीत वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.तक्रारीवरून मानकापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तरुणीचा शोध घेतला जात आहे.अगदी क्षुल्लकशा कारणावरून तरुणीने घर सोडल्याने कुटूंबीय चिंतातुर झाले आहेत.
- Advertisement -

