उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- आसाराम बापूंच्या अडचणीत वाढ होणार आहे.२०१३ सालच्या बलात्कार प्रकरणात त्यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून उद्या त्यांची शिक्षा जाहीर होणार आहे.बलात्कार प्रकरणात न्यायालयाने अन्य आरोपींना निर्दोष ठरवले आहे.मात्र आसाराम बापूंना न्यायालयाने दोशी ठरवले आहे.
आसाराम बापूवर २०१३ मध्ये सुरतच्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता.तर नारायण साईवर याच पीडितेच्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप होता.या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी,मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला,जस्सी आणि मीरा आरोपी आहेत.आसारामला न्यायालयात हजर करण्यात आले.सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी ठरवले पण शिक्षेची घोषणा केली नाही.शिक्षेबाबत उद्या निर्णय दिला जाईल; असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.