Tuesday, June 16, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी; अनियंत्रित वाहनामुळे मोठा अपघात; तरुण जागीच ठार -वन विभाग वडसा जवळील...

मोठी बातमी; अनियंत्रित वाहनामुळे मोठा अपघात; तरुण जागीच ठार -वन विभाग वडसा जवळील घटना…आत्ताची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज वरून आरमोरी मार्गे १ किलोमिटर अंतरावर वन विभाग वडसा जवळील टर्निंग पॉईंटवर दुचाकी वाहन अनियंत्रित झाल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक -१६ मे रोजी दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार,सदर युवक बाहेर ठिकाणाहून देसाईगंज मार्गे दुचाकीने जात होता.मात्र अचानक वन विभाग वडसा जवळील टर्निंग पॉईंटवर इतर वाहनांची रेलचेल सुरू असल्याने दुचाकी वाहन क्रमांक- एम एच ३६ ए एम ७७२१ अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला दुचाकी व युवक पडला.त्यात त्याचा उजवा पाय मोडला असून डोक्याचा भाग चेंदामेंदा झाल्याचे घटनेवरून दिसून येते.जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव श्रीकृष्ण राजकुमार वंजारी,वय ३२ वर्षे रा.आसगाव,पवनी असे आहे.तसेच सदर युवक इंजिनिअर असल्याचे कळते.सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास दिली असून युवकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!