उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातलाच कर्मचारी बोगस लिपीक भरती रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करुन मंत्रालयात बोगस लिपीक भरती रॅकेट खुलेआम होत असल्याने; या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे. गोवंडी पोलिसांनी निखिल माळवेला अटक केली तर शुभम मोहिते,निलेश कुरतडकर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.यात बनावट सही शिक्क्यांचा वापर करण्यात आला.
बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी; आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.सदर आरोपींचा माझ्या कार्यालयाशी कसलाही सबंध नाही असा खुलासा धनंजय मुंडेंनी केला आहे.