उद्रेक न्युज वृत्त
मुनिश्वर बोरकर/गडचिरोली
गडचिरोली:- चारचाकी वाहन धारकाने दुचाकी वाहन धारकांस वाचविण्याच्या प्रयत्नात आज ३ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दोघांमध्ये आरमोरी तालुक्यातील देऊळगांव(पंट्रोल पंप) जवळच भिषण अपघात झाला.
दुचाकीस्वार तिघे जण जखमी झाले असुन चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन सदर गाडीचा पूढील भाग चेदामेंदा झाला.सविस्तर वृत्त असे की,चारचाकी वाहन क्रमांक- MH३२ AH ६६७७ क्रेटा हि वर्धा वरून गडचिरोली जात होती तर दुचाकी वाहन धारक गडचिरोली वरून आरमोरी कडे जात होते.आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत देऊळगांव जवळ ( पेट्रोल पंप) जवळ या दोघांचा भिषण अपघात घडला.दुचाकीवर तिघे जण होते.त्यांच्या मागुन एक चारचाकी वाहन येत होते.त्यामुळे वर्धा वाल्या गाडी मालकाने दुचाकी वाल्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात सदर भिषण अपघात घडला.यात सोमेश्वर बावणे ५२ वैरागड , गणेश नवघरे गणेशपुर (शिर्शी) व एक तिसरा व्यक्ती त्याचे नाव कळू शकले नाही.तो गंभीर जखमी आहे. तर गणेश नवघरे यांच्या पायाला जबर मारहान आहे.मात्र चारचाकी वाहनातील सुखरूप असुन त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला गेल्यामुळे सदर गाडीचा पुढील भाग चेंदामेंदा झाला आहे.महत्वाची बाब अशी की दुचाकी वाहनाने पेट घेवून जळून खाक झाली.मात्र तिघेही गाडीवरून जिकडे-तिकडे पडल्यामुळे ते बचावले देऊळगाव वासीयांनी लगेच जखमिंनाचा झाडात नेले.रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मुनिश्र्वर बोरकर यांनी पोलिस स्टेशन आरमोरी व अम्ब्युलन्स ला फोन केला.आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमींना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.पुढील तपास आरमोरी पोलीस स्टेशन विभाग करीत आहे.