Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमैं झुकेगा नहीं...! 'मैं फायर नहीं,वाईल्ड फायर है..!' पुष्पा भाऊच्या...

मैं झुकेगा नहीं…! ‘मैं फायर नहीं,वाईल्ड फायर है..!’ पुष्पा भाऊच्या ‘पुष्पा-२’ चित्रपटाची स्टाईलच लय भारी.. – थिएटरमध्ये पहिल्या दिवशी जगभरात २९४ कोटींची कमाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बहुचर्चित लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या ‘पुष्पा’ भाऊची पहिल्या चित्रपटातील लव्हस्टोरी आणि जबरदस्त ॲक्टिंगने साऱ्या चित्रपट प्रेमींना घायाळ करून सोडले होते.पहिल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील कथानक बघता ‘पुष्पा -२’ चित्रपट निघणारच व केव्हा निघणार? याची सर्वचजण आतुरतेने वाट बघत होते.अशातच नुकताच ‘पुष्पा -२’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘पुष्पा-२’ तामिळ,तेलुगु,मल्याळम,कन्नड आणि हिंदी या ५ भाषांमध्ये रिलीज झाला आहे.अल्लू अर्जुन पुन्हा एकदा या चित्रपटात पुष्पराजच्या भूमिकेत आहे.रश्मिका मंदान्नाही श्रीवल्लीच्या अवतारात दिसत आहे.चित्रपटाची कथा जबरदस्त आहे आणि क्लायमॅक्स आणखीनच प्रेक्षणीय आहे.त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे.
‘पुष्पा-२’ मधील एक डायलॉग खूप फेमस होऊ लागला आहे. ‘मैं फायर नहीं,वाईल्ड फायर है..!’
थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर पुष्पा-२ गुगलवर ट्रेंड करीत आहे.अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-२’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होताच गुगलवर ट्रेंड करीत आहे.
अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट पुष्पा-२ ने थिएटरमध्ये पहिल्या दिवशी जगभरात २९४ कोटींची कमाई केली.यामध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे कलेक्शन १७५.१ कोटी रुपये होते. पुष्पा-२ ने हिंदी व्हर्जनमध्ये ७२ कोटींची कमाई केली आहे.हिंदी व्हर्जनने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा विक्रमही मोडला.जवानाने पहिल्याच दिवशी हिंदी पट्ट्यात जवळपास ६५ कोटी रुपयांची कमाई केली होती.जगभरातील कलेक्शनसह,पुष्पा-२ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग भारतीय चित्रपट बनला आहे.२०२१ मध्ये पुष्पाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमही केले.
भारतीय बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनच्या बाबतीत, पुष्पा-२ ने एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.RRR ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १३३ कोटींची कमाई केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!