- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून काल सोमवार १४ एप्रिल रोजी कुरखेडा
नगरपंचायत संचालित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचणालयातील विद्यार्थ्यांकरिता कैलाश व प्राची धोंडणे या दाम्पत्तियांनी मुलीच्या वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळत ४० स्पर्धा पुस्तकांचा संच उपलब्ध करून दिला आहे.
वाचणालयाकरीता आवश्यक असलेल्या ४० स्पर्धा पूस्तकांचा संच उपलब्ध करून दिला.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले कुरखेडा येथील धोंडणे दाम्पत्तियांनी मुलगी तनिष्क धोंडणे हिच्या वाढदिवसाचा अवांतर खर्च टाळत स्वखर्चाने विद्यार्थ्यांकरिता ४० स्पर्धा पुस्तकांचा संच उपलब्ध करून देत वाचनालय व्यवस्थापणास सूपूर्द केला आहे.याप्रसंगी कुरखेडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अनीता बोरकर,महिला व बालकल्याण सभापती प्राची धोंडणे,पाणी पुरवठा सभापती आशिष काळे,माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे,नगरसेवक जयेन्द्रसिंह चंदेल,नगरसेवक रामभाऊ वैद्य,नगरसेवीका हेमलता नंदेश्वर,नगरसेवीका कांताबाई मठ्ठे,वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडंणे,तनिष्क धोंडणे तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
- Advertisement -