Wednesday, July 15, 2026
Homeदेसाईगंजसृष्टी संस्थेच्या वतीने मासेमारी संस्थांना नावेचे वाटप..

सृष्टी संस्थेच्या वतीने मासेमारी संस्थांना नावेचे वाटप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तसेच कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर मत्स्यपालनाचा व्यवसाय केल्या जातो.मात्र,योग्य त्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसून,माश्यांची वाढ होत नसल्याची बाब कुरखेडा तालुक्यातील सृष्टी संस्थेचे संयोजक केशव गुरनुले व राकेश खेवले यांच्या निदर्शनास येताच ग्रामसभा/मासेमारी संस्था यांच्या बैठका आयोजित करून सुरु असलेल्या व्यवसायाची माहिती घेत समस्या जाणून घेतल्या.अशातच देसाईगंज, कुरखेडा तालुक्यात मोठे तलाव असल्याने बारमाही मासेमारी केली जाऊ शकते,तसेच मार्गदर्शनपर सर्व मासेमारी संस्थांचे ग्रामसभा बैठक घेऊन आपल्या स्थानिक तलावांना पुनरुज्जीवित करण्याविषयी चर्चा केली.तलाव पुनरुज्जीवित करणे,मत्स्य खाद्य लागवड करण्याची पद्धती जाणून घेण्यासाठी प्राइस वाटर हाउस कॉपर्स (PRICE WATER HOUSE COPERS) संस्थेच्या आर्थिक सहयोगाने मिलिंडा सेराव गोरेगाव,काजल तिवारी मुंबई यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध व शिवणीबांध येथील मत्स्यपालन केंद्राला भेट देऊन मत्स्यपालन सोसायटी/ग्रामसभा पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव,चोप,आमगाव,बोळधा, व कुरखेडा तालुक्यातील नल्लीकसा,दल्ली,चिपरी, सोनपूर येथील मासेमारी सोसायटी अध्यक्ष/सचिव उपस्थित होते.त्यात देसाईगंज तालुक्यातील आमगाव, बोळधा,कोरेगाव,चोप तर कुरखेडा तालुक्यातील नल्लीकसा या ठिकाणी मोठे तलाव असल्याने बारमाही मासेमारी करता यावी म्हणून ग्रामसभा / सोसायटी यांना संस्थाचे पदाधिकारी कुणाल गुरनुले, राकेश खेवले यांच्या हस्ते नाव(डोंगे) व जॉकेटचे वितरण करण्यात आले.यामागचा उद्देश म्हणजे, स्थानिक ग्रामस्थांना तसेच बाजारपेठेत तलावातून बारमाही खाण्यासाठी मासे उपलब्ध होतील व ग्रामसभा सोसायटी मासेविक्री करून त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल,असे सृष्टी संस्थेचे संयोजक गुरनुले यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!