Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरमुलीची नवलाई..! आई-वडिलांनी प्रशिक्षणासाठी पाठवले अन् अल्पवयीन मुलीने तरुणाला पटवले..

मुलीची नवलाई..! आई-वडिलांनी प्रशिक्षणासाठी पाठवले अन् अल्पवयीन मुलीने तरुणाला पटवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कित्तेक आई-वडील काबाळकष्ट करून आपल्या मुलांची हौस पूर्ण करतात.जेणेकरून,आमचे जीवन काबाळकष्ट करून वाया तर गेलेच,किमान मुलांचे जीवन तरी सुखात जावे; अशी अनेक आई-वडिलांची इच्छा असते.त्यासाठी,हात उसनवारी,कर्ज व नाना तऱ्हेचे प्रयत्न करून मुलांना शिक्षण देत असतात.पण,काही मुला-मुलींना आई-वडिलांच्या मेहनतीची कदरच उरलेली नसल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे.आई-वडिलांनी आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी नागपूर येथील वृषाली प्रशिक्षण केंद्रात दाखल केले.दरम्यान,इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका बिहारमधील युवकाच्या प्रेमात पडून ती बिहारला पळून गेली.आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तिचा शोध घेऊन मुलीला नागपुरात परत आणले आहे.तिच्या आई-वडिलांनी तिचा नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वृषाली पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत प्रवेश केला.प्रशिक्षण घेत असतांना ती बिहारमधील एका अकरावीच्या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली.दोघेही मागील आठ ते नऊ महिन्यांपासून इंस्टाग्रामवर सतत चॅटिंग करत होते. त्यानंतर अल्पवयीन मुलाने तिला बिहारला बोलावले. परंतु जाण्यासाठी पैसे नसल्याने तरुणीने आई-वडिलांना अकॅडमीमध्ये पैसे भरायचे आहे असे सांगून सात हजार रुपये मागितले.आई-वडिलांनी पैसे पाठवल्यानंतर तिने ते पैसे ॲकॅडमीत जमा न करता ती प्रयागराजला पळून गेली.प्रयागराज येथे अल्पवयीन मुलगा आला आणि दोघेही मुलाच्या गावी बिहार येथे गेले.वृषाली ॲकॅडमीतून न सांगता गेल्याची बाब तेथील प्रशासनाने तिच्या आई-वडिलांना कळवली.तिच्या आई-वडिलांनी कोराडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बिहारच्या महागामा येथे गेले आणि मुलीला सुखरूप नागपूरला परत आणल्याने आई वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!