Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमुख्याध्यापकांच्या खिशाला वीज बिलांच्या माध्यमातून लागतेय कात्री…

मुख्याध्यापकांच्या खिशाला वीज बिलांच्या माध्यमातून लागतेय कात्री…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांकडून सार्वजनिक सेवा दराने वीजबिल आकारले जात आहे. या शाळांना आर्थिक उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत नसून शासनस्तरावरही वीजबिल भरण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने जिल्हा परिषद शाळांची आर्थिक घुसमट सुरू आहे. एकीकडे वाढत्या स्पर्धात्मक युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागांतील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समित्या लोकसहभागातून पैसे खर्च करून शाळांना सुविधा पुरविण्यासाठी धडपड करीत आहे तर दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनी शाळांना सार्वजनिक सेवा बिल (एलटीएक्सबी) आकारून झटका देत आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ शहरी, खासगी शाळांची मक्तेदारी नसावी, यासाठी शासनाने खेडेगाव, आदिवासी बहुल क्षेत्र व दुर्गम भागांतील शाळांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला. प्रगत शैक्षणिक धोरणात डिजिटल शाळा,ई-लर्निंग, व्हर्चुअल क्लासरूमसारख्या संकल्पना शिक्षण विभाग राबवित आहे. शेकडो गावांमध्ये शिक्षक व गावकऱ्यांच्या प्रयत्नांतून तसेच विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, टेलिव्हिजन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र वीज वितरण कंपनीकडून शाळांना देण्यात येणाऱ्या मासिक बिलात स्थिर आकाराच्या नावाने तब्बल ३१० रुपये वसूल केले जात आहेत. अनेक शाळांची पटसंख्या कमी असते.तिथे शिक्षक कशी तरी तडजोड करून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर करतात. मात्र स्थिर आकार आकारला जात असल्याने कमी पटसंख्या असलेल्या शाळांना वीज बिल भरणे कठीण झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!