Monday, September 7, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमाजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची मुदत नुकतीच २३ ऑगस्ट २०२६ रोजी तर काहींची मुदत २५ ऑगस्ट २०२६ रोजी संपल्याने ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प होण्याची शक्यता आहे.कार्यकाळाची मुदत संपल्याने आता ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? याबाबत संभ्रम निर्माण झालेला असतांनाच महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी निवडणुका होईपर्यंत माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवावे,अशी मागणी पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.त्यातच,माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या प्रशासक पदाची मुदत संपल्याने ग्रामीण भागातील विकासकामे ठप्प होऊ नयेत,यासाठी माजी सरपंचांकडेच प्रशासक पदाची जबाबदारी व आर्थिक अधिकार सोपवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन सादर करतांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भअध्यक्ष प्रमोद गमे,नागपूर जिल्हाध्यक्ष सूरज पाटील,सरचिटणीस किशोर पकीड्डे, गजानन रामेकर,गुणवंत घोडमारे आणि मुकेश ढोमणे आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!