उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-शासकीय योजना अधिक लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवले जात आहे.२ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झालेले अभियान १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राबविले जाणार आहे.या अभियानाच्या माध्यमातून तब्बल एक कोटी महिलांना महिला शक्ती कायद्याच्या माध्यमातून नारी सत्तेचे सशक्तीकरण करण्याचे आणि महिला बचत गटांना प्रवाहात आणण्याचे लक्ष्य आहे.सध्याच्या घडीला महिला सशक्तीकरण करणे ही काळाची गरज झाली आहे.पूर्वी महिलांकडे चूल आणि मुल म्हणून बघितले जायचे; मात्र हल्ली काळानुरूप परिस्थिती बदलत चालली आहे.त्यामुळे शासन स्तरावरून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवले जात आहे.देसाईगंज तहसील कार्यालयाच्या वतीने शिवराजपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमात ते बोलत होते.अभियानात मानव विकास विभाग,आरोग्य, महसूल प्रशासन,कृषी,विद्युत,अन्न व पुरवठा, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय,पंचायत, संजय गांधी निराधार योजना आदी विभागांनी स्टॉल लावून योजनांची माहिती दिली.लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र,शिधापत्रिका,नवीन मीटरचे वाटप, बचत गटांना धनादेश वाटप, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप,गोल्डन कार्डचे वाटप, दिव्यांगांना साहित्य, रोटावेटर,उज्ज्वला योजनेतून गॅसचे वाटप,दिव्यांग प्रमाणपत्र,आम आदमी विमा योजना,आधार कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार प्रीती डुडूलकर, शिवराजपूरच्या सरपंचा सुषमा सय्याम,कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत, कुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रश्नाला गेडाम,उपसरपंच-रमेश वाढई,उपसरपंच सुरेश दोनाडकर,बीडीओ प्राजक्ता भस्मे, दादाजी भरेरे, प्रमोद बेदरे आदी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाला विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी,सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,मंडळ अधिकारी,तलाठी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अभियानाच्या यशस्वीतेसाठी तहसील,पंचायत समिती व अन्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

